Skip to main content

Biography

सुरुवातीचे जीवन

३१ ऑक्टोबर १८७५ साली गुजरातमधील नडीयाद गावी वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला.सहा भावंडांमध्ये त्यांचा चौथा क्रमांक होता.करमसाद गावात आई लाडबा यांच्या छत्रछायेखाली त्यांचे संगोपन झाले. वडील झवेरभाई शेती करायचे आणि बर्‍याच वेळा वल्लभभाई त्यांना  शेतीच्या कामात मदत करायचे. झवेरभाई १८५७ सालच्या बंडात झांसीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात असताना ब्रिटिशांशी लढले होते. वल्लभभाईंचा
जन्म झाला, तेव्हा मात्र ते पूर्वजांकडून मिळालेल्या दहा एकर जमिनीत शेती करून स्वस्थ
जीवन व्यतीत करत होते. आई लाडबा, प्रतिभावान स्त्री होती. त्यांचा गळा अगदी गोड होता.
रोज संध्याकाळी सर्व मुलांबरोबर अंगणात बसून भक्तीगीते म्हणायच्या आणि पुराणातल्या
गोष्टी पण सांगायच्या.                                         लहानपणी जरी वल्लभभाई गावातील शाळेत जात होते पण तरी, पाढे आणि साधी गणितं मात्र शेतावर जाता-येता वडिलांकडून शिकले. नवनवीन शिकण्याच्या जिज्ञासेमुळे
शाळेतील शिक्षकांना अनेक प्रश्न विचारायचे. अनेकदा शिक्षक चिडायचे आणि स्वत:च शिकायला

यशस्वी वकील.

१८९७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी पटेलांना मुंबईला जायचे होते.पण घरच्या जबाबदार्‍या असल्यामुळे त्यांनी स्थानिक वकील कार्यालयात नोकरी करण्याचा निर्णय घेतला  तिथे त्यांना कायद्याच्या पुस्तकांचाही लाभ झाला.पुढच्या दोन वर्षांत घरी अभ्यास करून जिल्हा वकीलीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९०० साली गोध्रा येथे वकिलीची सुरुवात केली.थोडेसे स्थिरावत असताना,गुजरातमधील अनेक भागात प्लेगची साथ पसरली.एका मित्राची देखभाल करताना पटेलांनाच प्लेगची लागण झाली.या सर्व परिस्थितीवर मात करून,बोरसाड शहरी त्यांनी आपला जम बसविला.त्याच शहरात त्यांचे थोरले बंधू विठ्ठलभाई राहत होते. उत्तम फौजदारी वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविले.

"नवीन वळण"

१९१७ पर्यंत पटेल एक यशस्वी बॅरिस्टर म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या कारकिर्दीतला हा अत्युच्च काळ होता. उत्तम सूट परिधान करून दिवसा कोर्टात
आपल्या आशिलांसाठी लढायचे आणि संध्याकाळी अहमदाबादच्या गुजरात क्बलमध्ये प्रतिष्ठित
लोकांबरोबर ब्रिज खेळायचे. त्यांना सिगार ओढायचा शौक होता. त्याच काळात अफ्रिेकहून
परतलेल्या गांधी नावाच्या व्यक्तीचा बोलबाला होत होता, पण त्या प्रतिथयश बॅरिस्टरनी
त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पटेलांनी सुरुवातीला गांधीजींच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रहाबद्दल’
ऐकलं, तेव्हा त्यांनी त्यांना वेड्यात काढलं आणि त्यांची टिंगल उडवली.

गांधींजींना गुजरात क्लबमध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांना
पाहण्यासाठी खूप गर्दी झाली. पटेलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ब्रिजच्या टेबलवरच
बसून राहिले. लोकांच्या गर्दीचा त्रास होत असल्यामुळे ते नाराज झाले. जेव्हा एका मित्रानी
गांधीजींचा भाषण ऐकण्यासाठी बोलावलं तेव्हा ते तुच्छपणे म्हणाले, ‘मला माहीत आहे, ते

वल्लभभाई ‘सरदार’ झाले.

पटेल यांनी इंग्रजी भाषेतील श्रीमंत बॅरिस्टरचे व्यक्तिमत्त्व सूट व टोपी घालून गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून खादीचा अवलंब केला होता.१९१८ मध्ये या परिवर्तनानंतर लगेचच पटेलांनी खेडा येथील शेतकर्‍यांच्या मोहिमेपासून स्वत:ला जनतेच्या सेवेत झोकून दिले.ब्रिटीश प्रशासनाने शेतकऱ्यांच्या याचिकेवर निर्णय घेण्यास नकार दिल्याने ते अयशस्वी झालेले पीक न घेता क्षेत्रातील कर भरण्यास नाकारले .गांधीजींकडे या लढ्याचे नेतृत्व करणे सोपवले गेले. त्यांनी सल्लेने पटेलांना या प्रचार मोहिमेसाठी निवडले.पटेलांनी आपले सहकारी नरहरी पारीख,मोहनलाल पंड्या आणि अब्बास तयब्बजी यांना बरोबर घेऊन,ग्रामस्थांना एकत्र केले आणि राज्यव्यापी बंड करून गुजरात प्रांतात कर भरण्यास नकार देण्याची मागणी केली.खेडा येथील ही मोहिम यशस्वी झाली आणि शेवटी सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या. यामुळे खेडाच्या शेतकर्‍यांच्या दृष्टीने पटेल नायक ठरले.               १९२० पासून आपल्या वकिलीचा पेशा सोडून पटेल पूर्णपणे जनतेच्या सेवेत गुंतले. ते गुजरातमध्ये स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, दारूबंदी, अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद यासाठीही लढले.

स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह

१९४२ साली गांधीजींनी 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले आणि ब्रिटिशांना सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी सविनय कायदेभंग करण्याची सर्व मोहिम सुरू झाली.कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी सुरुवातीला या प्रस्तावाला सहमती दिली नाही. सरदार पटेलांचे म्हणने होते की, जर देशभर क्रांती झाली तर,जनतेचा सहकार्य लाभेल आणि इंग्रजांना जाणीव होईल की,लोकमताविरुद्ध भारतात राज्य करणे कठीण आहे. गांधीजींची विनवणी ऐकून शेवटी ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने याला मान्यता दिली.पटेलांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी जनतेला कर भरण्यास नकार दिला आणि सविनय कायदेभंग या चळवळीत भाग घेण्याचे आव्हान केले.मुंबईच्या गोवालिया टँक येथे जमलेल्या एक लाखापेक्षा जास्त समुदायाला उद्देशून बोलताना,त्यांनी नागरी सेवा बंद करण्याचे आवाहन केले आणि विरोध करायला सांगितले.या निषेधा मधील त्याच्या भूमिकेसाठी त्याना ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना अटक झाली. कॉंग्रेस कार्यकारिणीचे सर्व सदस्य १९४२ ते १९४५ पर्यंत अहमदनगर किल्ल्यात बंदिस्त होते.

स्वतंत्र भारताचे स्वप्न दृष्टीपथात

१९४७ च्या सुरुवातीला ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ऍटली यांनी
लवकरच भारतातून जाणार असल्याची घोषणा केली. हा एक ऐतिहासिक क्षण होता. फेब्रुवारी

१९४७ मध्ये ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना ऍटली म्हणाले की, ब्रिटिश सरकार
जून
१९४८ पर्यंत भारताची सत्ता जबाबदार भारतीयांच्या हाती सोपवू इच्छिते. याच वेळी
लॉर्ड वेवेलच्या जागी भारताचे नवीन व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन यांची नियुक्ती
करण्यात आली. जून
१९४७ मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सत्ता हस्तातंराची तारीख म्हणून जून १९४८ ऐवजी ऑगस्ट १९४७ ला होईल अशी घोषणा केली.

पटेल व इतर अनेक जणांनी स्वातंत्र्याचा हा दिवस पाहण्यासाठी
खूप कष्ट सहन केले होते आणि हे स्वप्न साकारायला अगदी थोडा अवधी राहिला होता. पण हे ध्येय साध्य करताना त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागणार होती. अखंड भारताची फाळणी
अटळ होती. जरी सुरुवातीला पाकिस्तानच्या अस्तित्वाला जिनांचे 'एक वेडं स्वप्न' म्हणून

एकत्रीकरण : त्यांची महान परंपरा

 जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने देशाच्या संपत्तीवर दात रोवले, तेव्हा देशातील राजे-महाराजे आणि नवाबांनी त्यांना
पूर्ण साथ दिली. कंपनीने त्यांच्याबरोबर अनेक करार   केले आणि त्यामुळे कंपनीची
सत्ता खूप वाढली. ऑगस्ट  १९४७ मध्ये ब्रिटिश जेव्हा देश सोडून निघाले, तेव्हा या संस्थानिकांवरचा
त्यांचा दबाव पण संपला आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळाली. देशाचा
दोन पंचमांश भाग या संस्थानांनी व्यापला होता. काश्मीर आणि हैदराबाद संस्थान काही युरोपियन
देशांपेक्षा मोठी होती. इतर जागीर वगैरे अशीही होती की ज्यात फक्त काही गावांचा समावेश
होता. एकूण  ५६५ संस्थाने अशी होती की, ज्यांना १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीनंतर भारत किंवा पाकिस्तानात
विलिन होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा दिली होती.२७ जून  १९४७ रोजी म्हणजे
स्वातंत्र्याच्या दोन महिने आधी सरदार पटेलांच्या नेतृत्वात एक राष्ट्रीय खातं सुरू
करण्यात आले. या खात्याचे काम होते की, देशातील संस्थानांचे भारतीय सार्वभौमत्वात एकत्रीकरण

"शेवटचा काळ"

देश स्वतंत्र झाला तेव्हा, पटेल ७२ वर्षांचे होते.संस्थानांंच्या एकत्रीकरणाचे काम सुरू  करण्यापूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. पण स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे
सदस्य म्हणून त्यांनी  तत्काळ तीन मंत्रालये - गृह, राज्य आणि माहिती या खात्याचा कार्यभार सांभाळले.
याशिवाय त्यांच्यावर उप-प्रधानमंत्रीपदाची पण जबाबदारी होती.याच काळात जवाहरलाल नेहरू जेव्हा परदेशात प्रवास करीत होते तेव्हा पटेल यांच्यावर पंतप्रधान म्हणून कार्य करण्याची जबाबदारीही होती.  स्वातंत्र्य
मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाले, आता मी निवृत्त होतो अशी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व्ही.
पी. मेनन यांनी घोषणा केली, तेव्हा पटेलांनी त्यांना समज दिली की नवीनच अस्तीत्वात
असलेल्या देशाला त्यांच्या सेवेची गरज असल्यामुळे निवृत्त व्हायला आणि आराम करायला
आता वेळ नाही. पटेलांनी मजबूत स्वतंत्र भारत देशाच्या उभारणीसाठी स्वत:च्या वृद्धत्वाकडे
आणि प्रकृतीकडे दुर्लक्ष केले.

Launch Quiz

Timeline

All Timelines

भारतासमोरील आज सर्वांत मोठं कार्य म्हणजे स्वत:ला संघटित करणे आणि देशात सुसूत्रता आणून अखंडशक्ती निर्माण करणे होय!

तरुण पुरुष आणि स्त्रियांनी उत्तम चारित्र्य घडवायचं आहे. देशाचा मोठेपणा नेहमी जनतेच्या चारित्र्यात दिसून येतो. जत त्यात स्वार्थीपणा आला तर देशाची प्रगती होणार नाही आणि देश उच्च पदावर पोहचणार नाही. स्वत:च्या गरजा आणि कुटुंबाची देखभाल करताना जीवनात थोडा स्वार्थीपणा असतोच, पण याचा गोष्टीला जीवनात ध्येय बनवून चालत नाही.

चारित्र्य उभारताना दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत - अन्यायाविरुद्ध लढायची शक्ती निर्माण करणे आणि त्यात येणार्या अडथळ्यांचा सामना करणे. या दोन्ही गोष्टींमुळे धैर्य आणि जाणीव निर्माण होतात.

जोपर्यंत तुम्हाला कसं मरायचं हे माहीत नाही, तोपर्यंत कसं मारायचं हे शिकणं व्यर्थ आहे. भारताचं भलं दुष्ट शक्तींनी होणार नाही, उलट अहिंसेने देशाचं भलं होईल.

आपली खरी लढाई अहिंसेची लढाई आहे. हे धर्मयुद्ध आहे.

View all