भारतासमोरील आज सर्वांत मोठं कार्य म्हणजे स्वत:ला संघटित करणे आणि देशात सुसूत्रता आणून अखंडशक्ती निर्माण करणे होय!

तरुण पुरुष आणि स्त्रियांनी उत्तम चारित्र्य घडवायचं आहे. देशाचा मोठेपणा नेहमी जनतेच्या चारित्र्यात दिसून येतो. जत त्यात स्वार्थीपणा आला तर देशाची प्रगती होणार नाही आणि देश उच्च पदावर पोहचणार नाही. स्वत:च्या गरजा आणि कुटुंबाची देखभाल करताना जीवनात थोडा स्वार्थीपणा असतोच, पण याचा गोष्टीला जीवनात ध्येय बनवून चालत नाही.

चारित्र्य उभारताना दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत - अन्यायाविरुद्ध लढायची शक्ती निर्माण करणे आणि त्यात येणार्या अडथळ्यांचा सामना करणे. या दोन्ही गोष्टींमुळे धैर्य आणि जाणीव निर्माण होतात.

जोपर्यंत तुम्हाला कसं मरायचं हे माहीत नाही, तोपर्यंत कसं मारायचं हे शिकणं व्यर्थ आहे. भारताचं भलं दुष्ट शक्तींनी होणार नाही, उलट अहिंसेने देशाचं भलं होईल.

आपली खरी लढाई अहिंसेची लढाई आहे. हे धर्मयुद्ध आहे.

मी रांगडा आणि असंस्कृत आहे. मला एकच उत्तर माहीत आहे, जेव्हा देशासाठी प्रत्येकजण लढतो आहे तेव्हा स्वत:ला महाविद्यालयात कोंडून इतिहास आणि गणित शिकत राहणं हे समस्येचं उत्तर नाही. तुमचे स्थान तुमच्या देशबांधांवाच्या शेजारी आहे, जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत.

महात्माजींनी दोन गोष्टींविरुद्ध लढा पुकारला आहे. एक सरकारविरुद्ध आणि दुसरा स्वत: विरुद्ध ! पहिलं युद्ध संपलं आहे पण दुसरं कधीच संपणार नाही. स्वत:ची शुचिता अखंड सुरू राहणार.

आपण क्रांतीची मार्ग निवडू शकता, पण या क्रांतीचा समाजाला धक्का लागता कामा नये. क्रांतीमध्ये हिंसेला स्थान नाही.

अहिंसा ही आपल्या विचारातून, शब्दातून ( बोलण्यातून ) तसेच प्रत्येक कार्यातून (वागण्यातून) दिसली पाहिजे. कारण अहिंसाच आपल्याला यशाच्या दारापर्यंत नेऊ शकते. (कारण यशासाठी / यशप्राप्तीसाठी अहिंसा हाच एकमेव उपाय आहे.)

सत्याग्रहाचा मार्ग भ्याड लोकांसाठी नाही.

सत्याग्रही म्हणून नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की विरोधकांशी नेहमी शांतपणे वागायचे ! खरं पाहिलं तर आम्ही सतत शांतीसाठी आग्रह धरला आणि जेव्हा शांतीची कवाडे उघडतील तेव्हाच आम्ही आत प्रवेश करायचा असे ठरवले.

गांधीजींच्या दहा वाक्यामध्ये कुठल्याही शंभरपानी कायदेशीर यादीपेक्षा जास्त सामर्थ्य आहे.