पहिले उपपंतप्रधान म्हणून शपथ घेताना पटेल.

१९४७ च्या सुरुवातीला ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ऍटली यांनी
लवकरच भारतातून जाणार असल्याची घोषणा केली. हा एक ऐतिहासिक क्षण होता. फेब्रुवारी

१९४७ मध्ये ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना ऍटली म्हणाले की, ब्रिटिश सरकार
जून
१९४८ पर्यंत भारताची सत्ता जबाबदार भारतीयांच्या हाती सोपवू इच्छिते. याच वेळी
लॉर्ड वेवेलच्या जागी भारताचे नवीन व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन यांची नियुक्ती
करण्यात आली. जून
१९४७ मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सत्ता हस्तातंराची तारीख म्हणून जून १९४८ ऐवजी ऑगस्ट १९४७ ला होईल अशी घोषणा केली.

पटेल व इतर अनेक जणांनी स्वातंत्र्याचा हा दिवस पाहण्यासाठी
खूप कष्ट सहन केले होते आणि हे स्वप्न साकारायला अगदी थोडा अवधी राहिला होता. पण हे ध्येय साध्य करताना त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागणार होती. अखंड भारताची फाळणी
अटळ होती. जरी सुरुवातीला पाकिस्तानच्या अस्तित्वाला जिनांचे 'एक वेडं स्वप्न' म्हणून
पटेलांनी नाकारले असले, तरी हळूहळू त्यांना जाणीव झाली की, हे कडू औषध आपल्याला घ्यावेच
लागणार आहे.

वयाच्या
७२ व्या वर्षी स्वातंत्र्याची स्वप्नपूर्ती होत असतानासुद्धा त्यांनी निवृत्तीचा कधीही विचार केला नाही. उलट ते म्हणायचे, ‘या आनंदाच्या क्षणी, त्याच्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या
आणि कर्तव्यांची जाण ठेवणे आवश्यक आहे.’'खरंच आपल्यासमोर प्रचंड अडचणी आणि अपर्याप्त अडथळे आहेत; पण आम्हाला त्यावर मात करायचे आहे'.