मौलाना आझाद, सरदार पटेल आणि गांधी

१९४२ साली गांधीजींनी 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले आणि ब्रिटिशांना सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी सविनय कायदेभंग करण्याची सर्व मोहिम सुरू झाली.कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी सुरुवातीला या प्रस्तावाला सहमती दिली नाही. सरदार पटेलांचे म्हणने होते की, जर देशभर क्रांती झाली तर,जनतेचा सहकार्य लाभेल आणि इंग्रजांना जाणीव होईल की,लोकमताविरुद्ध भारतात राज्य करणे कठीण आहे. गांधीजींची विनवणी ऐकून शेवटी ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने याला मान्यता दिली.पटेलांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी जनतेला कर भरण्यास नकार दिला आणि सविनय कायदेभंग या चळवळीत भाग घेण्याचे आव्हान केले.मुंबईच्या गोवालिया टँक येथे जमलेल्या एक लाखापेक्षा जास्त समुदायाला उद्देशून बोलताना,त्यांनी नागरी सेवा बंद करण्याचे आवाहन केले आणि विरोध करायला सांगितले.या निषेधा मधील त्याच्या भूमिकेसाठी त्याना ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना अटक झाली. कॉंग्रेस कार्यकारिणीचे सर्व सदस्य १९४२ ते १९४५ पर्यंत अहमदनगर किल्ल्यात बंदिस्त होते.                                   १८५७ च्या उठावापासून ‘भारत छोडो’ आंदोलन हे ब्रिटिशांच्या विरोधात केलेले सर्वांत प्रभावी बंड ठरले.या चळवळीचा असा प्रभाव होता की,१९४५ मध्ये जेव्हा सरदार पटेलांची जेव्हा सुटका झाली,तेव्हा ब्रिटीशांनी सत्तेचे हस्तांतरण काँग्रेसला दिले आणि रवाना झाले.अनेक वर्षे उराशी बाळगलेले  स्वप्न पूर्ण होणार असे वाटले.