प्रत्येक नागरिकानी लक्षात ठेवले पाहिजे की, तो भारतीय आहे आणि त्याला देशातील सर्व हक्क मिळतील, जर त्यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवली तर !

प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे, आता आपण स्वतंत्र देशात राहतो. या स्वातंत्र्याचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

हजारो रुपयांचे नुकसान झाले आणि प्राणाची आहुती द्यावी लागली तरी, परमेश्वरावर आणि सत्यावर विश्वास ठेवा आणि आनंदी रहा.

अंगात बळ नसले तर नुसता विश्वास व्यर्थ आहे. कुठलेही मोठ कार्य पाडताना विश्वास आणि ताकद दोन्ही आवश्यक आहे.

जोपर्यंत ऐक्य नाही तोपर्यंत नुसते मनुष्यबळ कामाचे नाही. पण त्याच मनुष्यबळाला नीट दिशा देऊन एकत्र काम केले तर ती एक दैवी शक्ती बनू शकते.

माझी एकच अशी इच्छा आहे की, भारत चांगला उत्पादक देश असावा आणि कोणीही भुकेले नसावेत, देशात अन्नधान्यासाठी अश्रू वाहू नयेत.
 

या मातीचे असे काही वैशिष्ट्य आहे की, अनेक संकटांना सामोरे जाऊनसुद्धा हा देश महान शक्तींचे निवासस्थान राहिला आहे.