प्रजासत्ताक राज्य प्रणालीत वर्तमानपत्रांना आणि प्रत्येक व्यक्तीला विचार मुक्तपणे मांडायला, संघटित व्हायला पूर्ण स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे.

लाखो लोकांच्या बलिदानामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आपण हे स्वातंत्र्य जर परदेशी संस्थांसाठी काम करणार्यांच्या आणि भय निर्माण करणार्यांवर सोपवलं तर त्या अनेक लोकांच्या बलिदानाचा अपमान होईल.

जातीभेदाने अडचणी निर्माण होतील. प्रत्येक भारतीय या देशाचा सुपुत्र किंवा पुत्री आहे. आपण प्रेमाने आणि एकमेकांच्या साह्याने या देशाचे भवितव्य उज्ज्वल करू.

हे खरं आहे की, आपण पारतंत्र्याला देशातून घालवले. पण त्यानंतर मात्र आपण अपापसात भांडत बसलो. जगासमोर आपण असं एक चित्र उभं केलं आहे की, जे आपल्या संस्कृतीच्या आणि गांधीजींच्या शिकवणीच्या पूर्ण विरुद्ध आहे.

आनंद आणि दु:ख कागदाचे बोळे आहेत. मरणाला घाबरू नका.राष्ट्रीय शक्तीशी एकरूप व्हा. भुकेल्या माणसाला काम द्या. अपंगाला अन्न द्या. आपापसांतील भांडणं विसरून जा.

कामामध्ये काही लोकांचा निष्काळजीपणा एखादी नाव रसातळाला नेऊ शकत. तेच जर नावेतील सर्व प्रवासी एकजूट झाले, तर नाव सुखरूपपणे किनार्यावर आणता येते.

आपण आपापसातील भांडण मिटवली पाहिजेत. कोणालाही कमी न लेखता समानेतची भावना दृढ केली पाहिजे. अस्पृश्यतेच निवारण करून ब्रिटिश राज्य यायच्या आधीच्या स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे. सर्वांनी एकत्र कुटुंबासारखे वागायला पाहिजे.

आज उच्च-नीच, श्रीमंत-गरीब आणि जाती आणि वर्ण यांच्यातील भेद संपवायला हवं आहे.

अन्यायाविरुद्ध लढताना तुमचा चांगुलपणा आड येऊ शकतो, म्हणून त्याच्याविषयी डोळ्यांत राग ठेवा आणि कठोरपणा दाखवा.

आपलंच सरकार जिथे स्थापन होतं तिथे एकजूट होणं आणि सहकार्य करणं आवश्यक असतं.

सत्याग्रहाची लढाई दोन प्रकारची असते. एक म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा आणि दुसरं म्हणजे स्वत:च्या कमकुवतपणाशी लढणे !

एकत्र येऊन काम केल्याने, आपण देशाला उच्च स्थानावर नेऊ शकतो. याउलट आपापसांतील कलहाने नवे संकट ओढवून घेतो.