१९२१मध्ये, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन अहमदाबादमध्ये आयोजित केले होते.अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून पटेलांची निवड झाली.अधिवेशनाला ५,००० पाहुणे आणि प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता होती आणि त्या सगळ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पटेलांच्या खांद्यावर होती.
सर्व दिखावा बाजूला ठेवून, महत्त्वाच्या गरजांकडे म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून नियोजन केले. अहमदाबादमध्ये पाण्याची कमतरता होती. त्यांनी पाणी पुरवठ्याची नवीन यंत्रणा उभारली. त्यामुळे पाहुण्यांना तर भरपूर पाणी मिळालेच, पण शहराला सुद्धा पाणी पुरवठ्याची एक नवीन दिशा मिळाली. कुठल्याही गोष्टीचे उत्तम नियोजन करण्याचा स्वभाव असल्यामुळे म्हणजे अगदी चपला, जोड्यांचीही व्यवस्था केली. यापूर्वी नागपूरला झालेल्या अधिवेशनात त्यांनी पाहिले होते की,लोक चपला चोरीला जाण्याबद्दल किंवा बदली न होण्यासाठी काळजी करत असतात. स्थानिक शेतकर्‍याकडून खादीच्या शेकडो छोट्या पिशव्या बनवून घेतल्या आणि अधिवेशनाला आलेल्यांना विकल्या. आलेल्या पाहुण्यांना आपले जोडे काढून पिशवीत घालून नेता आले. पाहुणे तर खूश झालेच, पण बरोबरीने हजारो वार खादीची विक्रीही झाली.
अधिवेशनात बोलताना ते म्हणाले, ‘सरकारने जबरदस्तीने आपल्या शाळा ताब्यात घेतल्या आहेत. शिवाय लोकांची संपत्ती हडपणे, खासगी घरांची झडती घेणे, स्त्री व पुरुषांना डांबून ठेवणे वगैरे कृत्यामुळे मला वाटते आपण स्वराज्याकडे वाटचाल करत आहे. सरकारच्या या कारवाईमुळे, आपल्या लोकांना स्वत:चे बळ आणि निश्चय दाखवण्याची संधी मिळाली आहे. बारडोली आणि आनंदचे लोक कुठल्याही क्षणी कृती करायला तयार आहेत. तिथेच आम्ही सरकारला आपली ताकद दाखवू.’
पटेलांचे लोकांना संघटित करण्याचे कौशल्य आणि स्वराज्य मिळवण्यासाठीचा त्यांचा दृढनिश्चय सर्वांना ज्ञात झाला होता. त्यामुळे लवकरच नुसत्या गुजराथच्या जनतेचे पुढारी न राहता ते देशाचे पुढारी झाले.
या छायाचित्रात १९२१ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनात वल्लभभाई पटेल आणि सरोजिनी नायडू गांधीजींबरोबर ध्वजवंदनाच्या समारंभात दिसत आहेत."

DC Identifier
1921-NAI-SP-132
DC Location
अहमदाबाद, भारत
Free tags
DC Format
jpg
DC Type
छवि
Subject Classification
Indian National Congress
Association with Gandhi

Feedback Form