"अहमदाबाद शहराच्या स्वच्छतेबद्दल जनतेला उद्देशून पटेल म्हणाले, ‘महापालिकेनी कितीही प्रयत्न केले तरी शहर स्वच्छ ठेवू शकत नाही, कारण त्याला तुमचे सहकार्य आवश्यक आहे. आपला कचरा रस्त्यावर न टाकता, महापालिकेने पुरवलेल्या डब्यात टाका, तरच तुम्ही शहराचा, तुमचा भाग स्वच्छ ठेवू शकाल, रोगराई कमी करून स्वत:चे आयुष्य वाढवू शकाल.

१९२४ मध्ये वल्लभभाई अहमदाबाद पालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पुढची चार वर्षे म्हणजे १९२८ मध्ये त्यांनी स्वत:चा राजीनामा देईपर्यंत ते या पदावर होते. आपल्या कारकीर्दीत, रोज सकाळी आपल्या मित्रांबरोबर शहराच्या वेगवेगळ्या भागात फेरफटका मारण्याचा त्यांनी नियम केला. या वेळी स्थानिक लोकांशी चर्चा करून स्वच्छता, वीज आणि शहरातील इतर गरजांबद्दल जाणून घेतले.

स्वत: ऑफिसमध्ये बसून इतरांना ऑर्डर देण्याची त्यांना सवय नव्हती. स्वत: हातात झाडू घेऊन इतर कार्यकर्त्यांसोबत शहराचे रस्ते झाडायला जात असत. कचरा उचलण्यासाठी डबा आणि झाडू घेऊन शहराच्या हरिजन किंवा अस्पृश्यांच्या वस्तीत स्वच्छता करायला सुरुवात केेली. शहराच्या नागरिकांनी असे घडताना कधीच पाहिले नसल्यामुळे ते बघतच राहिले. शहरातील सनातनी लोकांना हे पटने अशक्य होते त्यांनी पटेलांवर बहिष्कार टाकण्याबद्दल चर्चा सुरू केली, ही गोष्ट तरुण वर्गाच्या जेव्हा लक्षात आली, तेव्हा त्यांनी स्वत:चे स्वयंसेवक तयार करून शहर स्वच्छ करायला सुरुवात केली.

शहराची पाणी व्यवस्था सुधारण्यासाठी पैशांची गरज होती. पटेलांनी एका आठवड्यात शहरातील बँक आणि गिरणी मालकांकडून ४५,५०,०००/- रु कर्ज जमवले. पाणी पुरवठाा अद्ययावत करत असतानाच त्यांनी शहर स्वच्छता, जनतेचे आरोग्य आणि इतर सर्व गोष्टी ज्या पालिकेने करायला पाहिजेत त्याकडेही लक्ष दिले.

या छायाचित्रात १९२९ मध्ये सरदार पटेल आणि त्यांचे बंधू विठ्ठलभाई पटेल दिसत आहेत."

DC Identifier
19YY-NAI-SP-65
DC Location
India
Free tags
DC Format
jpg
DC Language
English
DC Type
Image
Subject Classification
Family

Feedback Form