"आपल्या वयाच्या सतराव्या वर्षी पटेलांचे गना गावातील झवेरबाई यांच्याशी लग्न झाले. दुर्दैवाने झवेरबाईंसंबंधी आणि त्यांच्या जीवनाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांना १९०४ मध्ये मणि ही मुलगी आणि १९०५ मध्ये दाह्या हा मुलगा झाला. मुले फक्त ५ आणि ३ वर्षांची असताना, १९९० मध्ये, वयाच्या २९ व्या वर्षी झवेरबाईंचे निधन झाले.

अनेक वर्षांनंतर मणीबेनना जेव्हा त्यांच्या आईंबद्दल विचारले गेले तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘मला कल्पना नाही.’ त्यांच्या वडिलांनी आईबद्दल कधीच काही सांगितले नाही.

छायाचित्रात सरदार पटेल (उजवीकडे) त्यांची आई लाडबा आणि भावंडे दिसत आहेत. पटेलांच्या पत्नी झवेरबाई यांचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही."

DC Identifier
19YY-NAI-SP-54
DC Location
India
Free tags
DC Format
jpg
DC Language
English
DC Type
Image
Subject Classification
Family

Feedback Form