"१९३१ साली नुकत्याच जेलमधून सुटलेल्या पटेलांना भारतीय राष्ट्रीय
कॉंग्रेसच्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष नेमण्यात आले.

आपल्या भाषणात ते म्हणतात की, ‘मला जाणीव आहे की, या पदासाठी माझी निवड देशाचा सेवक म्हणून मी जे काही थोडेबहूत काम केले त्यासाठी नव्हे, तर मागच्या वर्षी गुजराथमध्ये केलेल्या अभूतपूर्व त्यागाचा परिणाम आहे.’

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना सॅडर्स नावाच्या पोलीस ऑफिसरची लाहोर येथे झालेल्या हत्येबद्दल दिलेल्या फाशीमुळे देशात ज्यावेळी रागाची लाट उसळली होती, त्यावेळी त्यांना हे अध्यक्षपद मिळाले होते. फाशीच्या शिक्षेविरुद्ध ठराव पास करायचा होता, पण कॉंग्रेस देशातल्या कुठल्याही राजकीय हिंसाचारापासून स्वत:ला दूर ठेवू इच्छित होते. कराची अधिवेशनात ‘भगतसिंग झिंदाबाद’ या घोषणेबरोबरच गांधी आणि इतर नेत्यांविरुद्ध घोषणा देण्यात आल्या होत्या.

या सर्व गोंधळात, अध्यक्षांच्या नात्यानी सभेला उद्देशून भाषण द्यायला पटेल उठले आणि त्यांच्या नेहमीच्या शैलीत कुठेही शब्दांची सरमिसळ न होऊ देता, आपल्याला काय वाटते ते स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘मी इथे जमलेल्या सर्व तरुणांच्या भावनांशी सहमत आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना निर्दयतेने दिलेल्या फाशीमुळे पूर्ण देशात राग आढळत आहे. मी जरी त्यांना वापरलेल्या पद्धतीशी समहत नसलो तरी, त्यांनी दाखवलेली देशभक्ती, धैर्य आणि केलेला त्याग यांचे मी अमाप कौतुक करतो.’

त्याच्या भाषणाचा योग्य परिणाम झाला आणि कॉंग्रेसने त्या कृत्याचा निषेध करून ठराव पास केला. आयुष्यभर पटेल अगदी स्पष्ट वक्ता राहिले. ते मनापासून बोलायचे. त्यांचे भाषण लांबलचक नसायचे, पण जे बोलायचे ते इतरांच्या मनात घर करून जायचे !

या छायाचित्रात एका कॉंग्रेस अधिवेशनात पटेल, आचार्य कृपलानी शंकरराव देव आणि कमलादेवी चटोपाध्यायांच्याबरोबर दिसत आहेत."

DC Identifier
19YY-NAI-SP-154
DC Location
India
Free tags
DC Format
jpg
DC Type
Image
Subject Classification
Indian National Congress

Feedback Form