सरदार पटेल यांचे बालपणीचे छायाचिञ.

३१ ऑक्टोबर १८७५ साली गुजरातमधील नडीयाद गावी वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला.सहा भावंडांमध्ये त्यांचा चौथा क्रमांक होता.करमसाद गावात आई लाडबा यांच्या छत्रछायेखाली त्यांचे संगोपन झाले. वडील झवेरभाई शेती करायचे आणि बर्‍याच वेळा वल्लभभाई त्यांना  शेतीच्या कामात मदत करायचे. झवेरभाई १८५७ सालच्या बंडात झांसीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात असताना ब्रिटिशांशी लढले होते. वल्लभभाईंचा
जन्म झाला, तेव्हा मात्र ते पूर्वजांकडून मिळालेल्या दहा एकर जमिनीत शेती करून स्वस्थ
जीवन व्यतीत करत होते. आई लाडबा, प्रतिभावान स्त्री होती. त्यांचा गळा अगदी गोड होता.
रोज संध्याकाळी सर्व मुलांबरोबर अंगणात बसून भक्तीगीते म्हणायच्या आणि पुराणातल्या
गोष्टी पण सांगायच्या.                                         लहानपणी जरी वल्लभभाई गावातील शाळेत जात होते पण तरी, पाढे आणि साधी गणितं मात्र शेतावर जाता-येता वडिलांकडून शिकले. नवनवीन शिकण्याच्या जिज्ञासेमुळे
शाळेतील शिक्षकांना अनेक प्रश्न विचारायचे. अनेकदा शिक्षक चिडायचे आणि स्वत:च शिकायला
सांगायचे. त्यांचे म्हणने ऐकून अनेक गोष्टी ते स्वत:हून शिकले. सोळाव्या वर्षी सातवी इयत्ता झाल्यानंतर
आपल्या करमसाद गावी इंग्रजी शाळा नसल्यामुळे इंग्रजी शिकण्याच्या उद्देशाने व पुढच्या
शिक्षणासाठी वल्लभभाई पेटलाड नावाच्या गावी राहायला गेले. हे गाव त्यांच्या घरापासून सात मैलांच्या अंतरावर होते. गावातील अजून सहा मुलांनाही आपल्याबरोबर पेटलाडला येण्यासाठी तयार केले. सर्वांनी मिळून पेटलाडला घर भाड्यानी घेतले. सर्वजण मिळून स्वयंपाक करायचे आणि घरातील इतर कामे वाटून घ्यायचे.           २२ व्या वर्षी त्यांनी नडियाद मॅट्रिक पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी मुंबईत अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांचे जीवन दुसऱ्या दिशेने वळले.                                 दरम्यान, वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे जवळच्याच गावातील जावेरबाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. दुर्दैवाने, ते जावेरबाई यांना फारच कमी ओळखत होते नंतर, त्यांना दोन मुले जन्माला आली १९०४ मध्ये मुलगी मणि आणि १९०६ साली  मुलगा दाह्या यांचा जन्म झाला.